आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला:म्हणाले - काय बोलताय संजय राऊत? इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी काय भोगलं याची कल्पना आहे का?

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ज्या प्रकारची राजवट सुरु आहे. त्यावरून वाटते की, देशात इंग्रजांची राजवट सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकारेच वक्तव्य करून जुलमी राजवटीतून भारतमातेची सुटका करण्यासाठी लढलेल्या प्रत्येक घटकाचा असा अपमान करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा रोख सवाल केला. तसेच किती अकलेचे तारे तोडाल? असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी टि्वट करून म्हटले, की देशातल्या आजच्या राजवटीपेक्षा इंग्रज बरे होते? काय बोलताय संजय राऊत? इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी काय भोगलं याची कल्पना तरी आहे? त्या जुलमी राजवटीतून भारतमातेची सुटका करण्यासाठी लढलेल्या प्रत्येक घटकाचा असा अपमान करायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला? किती अकलेचे तारे तोडाल? या शब्दात संजय राऊत यांच्यावर पाटलांनी निशाणा साधला. याशिवाय, आणखी एक ट्विट करत देवेंद्रजींनी दिलेलं मराठा आरक्षण घालवायचं, हाच प्रयत्न मविआ सरकारनं केला. त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचंच नाहीये, असा आरोप पाटलांनी केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
देशात सध्या दिलासा घोटाळा सुरु आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात. इतरांवर ते का सिध्द होत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे. देशात जे काही सुरू आहे ते पाहिल्यावर इंग्रज बरे होते असे वाटते, असे संजय राऊत म्हणाले होते. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना मेळ्याव्यानिमित्त संजय राऊत पुणे दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...