आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कोर्टात:12 आमदारांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात जाणार भाजप; चंद्रकांत पाटलांचा दावा- आमच्या आमदारांनी शिवीगाळ केलीच नाही!

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिलेली नाही

विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. आज या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी विधानसभेत अभुतपूर्वी गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. यानंतर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता या 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिलेली नाही. भास्कर जाधव यांनीच शिवी दिली पण कारवाई आमच्या आमदारांवर करण्यात आले. तसेच आमदारांना निलंबित केल्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच खोटे कसे बोलायचे हे या सरकारकडूनच शिकायला हवे असेही पाटील म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'भाजप ही काही साधीसुधा पक्ष नाही, 106 आमदार निवडून आलेला हा पक्ष आहे. आज तुम्ही 106 आमदार असलेल्या पक्षाचा आवज हा दडपला आहे, या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. राज्यपालांकडे निलंबित केलेले 12 आमदार गेले होते, आता आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. हा अन्याय आहे. अशाप्रकारचे सगळे निर्णय गोळा केल्यानंतर असे लक्षात येते की, आपल्याला न्यायालयामध्ये न्याय मिळेल' असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...