आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादरा-नगर हवेली पोटनिवडणूक:“एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद, बाकीच्या निवडणुकासुद्धा शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात”, चंद्रकांत पाटील याचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाला आता धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. देशातील अनेक भागात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात पराभव स्विकारावा लागला.

शिवसेनेने आता दादरा-नगर हवेली येथील पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला असून, शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचा खासदार निवडूण आला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राबाहेर पहिले पाऊल, दादरा-नगर हवेली Via दिल्लीकडे, असे ट्विट केले होते. त्यानंतर आता त्या ट्विटला भाजपकडून उत्तर आले आहे.

"दसऱ्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की तुम्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन निवडणूक लढविली. पण, तुम्ही काय केले. दादरा-नगर हवेलीमधील उमेदवार तुमचे होते का? आम्ही दुसरे उमेदवार घेतले तर आमच्यावर टिका-टिप्पणी केली जाते. पण, तुम्ही तेच करता त्याचे काय?'

"डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर सहानुभूतीची लाट होती त्यामध्ये तुम्ही निवडून आलात. आता बाकीच्या निवडणुका सुद्धा शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात. एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हा हास्यास्पद दावा आहे. सर्वसामान्यांना हे आवडेल की नाही ते बघा" असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...