आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे:चंद्रकांत पाटील; म्हणाले - देशात बदलाचे चित्र असे म्हणणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी हिंमत असेल तर पदाचा राजीनामा देत पुन्हा निवडणून यावे, ज्या आमदारांच्या मतावर ते निवडून आले आहेत, ते आमदार आता सोडून गेले आहेत असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे. तर देशात बदलाचे चित्र असे म्हणणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत असा टोला शरद पवारांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात भाजपच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार, संजय राऊत, आणि कसब्यातील पराभव यांवर भाष्य केले आहे. येत्या दोन दिवसात कसब्यातील पराभवावर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. कसब्यातील पराभवानंतर पुणे ते कोल्हापूर त्यांना डिवचण्यात आले, कोल्हापुरात लावलेल्या बॅनरवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

​​चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत, ते लोकांना शिव्याशाप देत आहेत. त्यांना मी एन्जॉय करतो असे म्हणतानाच त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. माझ्यावर शाईफेक करण्यात आली त्यानंतरही मी राजकारणात सक्रिय आहे, हे विरोधकांना पचवणे अवघड झाले आहे. माझी कोंडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तरीही मी त्यांना सापडत नाही. ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने कसब्यातील पराभवाचे फ्लेक्स कोल्हापुरात उभारले गेले असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विरोधकांना माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळणार असेल, तर त्यांनीही ती करावी असा टोलाही त्यांनी लगावला. तर लोकांची कामे केली तर मते मिळतील का नाही, प्रसिद्धी मिळेल का नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र, पुण्य नक्की मिळेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...