आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा:आज कोणतीही नकारात्मक बातमी शेअर करण्याची इच्छा नव्हती, पण झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... तेव्हा 10-12 दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनाही समोर आल्या आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी या विषयावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

'आज रविवार, आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा 10-12 दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या.' असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

'ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार ? ' असा सवालही पाटलांनी केला आहे. त्यांनी राज्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराची यादीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  • 2 मार्च- जम्बो कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून महिलेचा विनयभंग.
  • 3 मार्च- औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न.
  • 4 मार्च – जळगावमध्ये पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचवलं.
  • 6 मार्च – शिक्षिकेचा विनयभंग करून तिला धमकी देण्यात आली.
  • 7 मार्च -पैशांसाठी विवाहितेचा छळ.
  • 8 मार्च – महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केला.
  • 11 मार्च – 7 महिन्यांच्या बाळासह महिलेची गळफास लावून आत्महत्या.
  • 12 मार्च -पित्याकडून मुलीवर अत्याचार.
बातम्या आणखी आहेत...