आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो कारशेड प्रकरण:उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही सुरुवातीपासूनच मेट्रो कारशेडला इगोचा विषय बनवला, चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (रविवार) जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडवर आपले मत मांडले. हवं तर कारशेडच श्रेय तुम्हाला देतो पण हा प्रश्न सोडवा असे मुख्यमंत्री म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटा असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? टीम इंडिया असे समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे! आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे 80 टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच याला इगोचा विषय बनवला.

जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे.

दरम्यान, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...