आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांना ईडीची धमकी:चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खोचक टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना काही लोक पेटिएमने पैसै देत आहे. तुम्ही पैसै घेऊ नका कारण आम्ही ईडीकडे या प्रकरणाची तक्रार करणार आहोत, या प्रकरणी तुमचीही चौकशी होऊ शकते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

भाजप केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर विरोधकांना दडपण्यासाठी करत आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा थेट भाजपची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाईसाठी ईडीचा भाजपकडून गैरवापर सुरू आहे. आणि आता तर थेट कोल्हापुरातील मतदारांनाच चंद्रकांत पाटील यांनी ईडीची धमकी दिली आहे. त्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हजार रुपयांसाठी ईडी चौकशी करणार?
चंद्रकात पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची चौकशी होईल, अशी धमकी दिली है अत्यंत चुकीचे आहे. भाजपला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्याचा राज्यातील जनाधार कमी झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जनतेने भाजपला जागा दाखवली आहे. कोल्हापुरात भाजपला पराभव दिसत असल्याने त्यांनी मतदारांना धमकी दिली आहे. आता ईडी हजार रुपयांसाठी चौकशी करणार का? आणि ती भाजपच्या इशाऱ्यावर होणार का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

सत्ता नसल्याने मानसिक संतुलन गेले
राज्यात भाजपला सत्ता मिळाली नाही, म्हणून चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आणि यातूनच सत्ता नसलेल्या राज्यात भाजप ईडी, आयकर, सीबीआय यांचा गैरवापर करत आहे. आणि राज्यात भितीचे वातावरण तयार करत आहे. मात्र कोल्हापुरची जनता भाजपला योग्य जागा दाखवेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...