आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश:चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफील्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत, याकरिता उपाययोजना करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वन पर्यटन, पर्यावरण व व्याघ्रसंवर्धन आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.

धावपट्टीची लांबी निश्चित वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबरमधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळवण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिले. या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलीकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...