आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला येणे गुन्हा आहे का?:​​​​​​​बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले- हा माझ्या कुळाचा सन्मान

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत बुधवारी शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना नैराश्य आल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. आपण गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो, कष्टातून आई-वडिलांनी आपल्याला घडवलं याचा मला अभिमान वाटतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ठाकरे कुत्सितपणे माझ्या कुळाचा उल्लेख करतात, माझे आई-वडील शेतकरी आहेत. कष्टातून त्यांनी मला घडवलं, मला संघर्षाचा वारसा आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हा गुन्हा आहे का? असे थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

हा माझा सन्मानच

पुढे ते म्हणाले की, माझ्या कुळाचा उद्धार करून ठाकरेंचे नैराश्य दूर होणार असेल, तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

काल मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला त्यात उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र केले होते. ठाकरे म्हणाले होते की, सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

चित्त्याचा आवाज म्यँव...

ठाकरे म्हणाले की, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? बाहेरचे उपरे एवढे घेतले की. बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सत्तर वर्षानंतर काय म्हणे चित्ता आणला पण चित्त्यांची काय डरकाळी, पण चित्ता डरकाळी फोडत नाही. पिंजरा उघडला तर आवाज म्यँव निघाला.

बातम्या आणखी आहेत...