आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप VS ठाकरे:उद्धव ठाकरे कर्तृत्व शून्य घरकोंबडे, त्यांनी भाजपचा विश्वासघात केला; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे घरकोंबडे आहेत. ते कर्तृत्व शून्य असून, त्यांनी भाजपचा विश्वासघात केला. यानंतर ते आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही बोलले, तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते मुंबईत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्यात मच्छर मारण्याची हिंमत नाही. त्यांनी चड्डीत राहावे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले. त्यावरून भाजप नेते आक्रमक झालेत.

तोंड सांभाळून बोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दांत टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हा घरकोंबडा आहे, फडणवीस जर बोलले तर त्यांना घरातून निघने मुश्कील हेाईल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड संभाळून टीका करा. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यर्काळात किती फडतूस कारभार केला, हे सर्वांनी पाहिले आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केले हे जनता विसरली नाही. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर राजीनाम घेऊ शकले नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

ही धमकी समजा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. सर्व हातून निघून गेलेला माणूस जसे आत्महत्या करण्यासाठी जात असतो. तसे उद्धव ठाकरे राजकीय आत्महत्या करण्यासाठी निघाले आहेत. यानंतर जर उद्धव ठाकरे असे बोलले तर बघा, अशी धमकीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या आशयाचे ट्विटही त्यांनी केले आहे.

मोठ्या-मोठ्या बाता करतात

आमदार नीतेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, पोलिसांच्या गराड्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस यांना कुणीही फडतूस बोलेल, 10 मिनिटे पोलिस सरंक्षण बाजूला ठेवा आणि मग फडतूस बोलण्याची हिंमत करा. मच्छर मारण्याची हिंमत नाही आणि मोठ्या मोठ्या बाता करतात. त्यामुळे चड्डीत राहायचे आणि लायकी ऐवढेच बोलयाचे.