आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणता राणावरुन भुजबळांना चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला:नंबर वनची धडपड असल्याचा आरोप, छगन भुजबळांचाही पलटवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली, या टीकेला प्रतित्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की मी शरद पवारांच्या नजरेत एकच नंबर आहे. बावनकुळेंनी नवीन वाद उकरुन काढू नये असे म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागेल आहे. छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर आहे, ते मिळविण्यासाठी छगन भुजबळ शरद पवारांच्या नजरेत 1 नंबर राहण्यासाठी भुजबळ शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असावेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या ​​​​​कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड स्टंटबाज

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबाबद्दल सहानुभूती व्यक्त करतात.दर्ग्याचे दर्शल करताना खोटे बोलून औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत असल्याचे विधान करतात, कारण आव्हाड स्टंटबाज आहेत. त्यांच्या मतदारसंघात असलेले राजकारण जिंवत ठेवण्यासाठी ते असे वक्त्व्य करत असतात. राजकारण करण्यासाठी ते महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकतात असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. तर हिंदुत्वाचा विचार मांडणारा वर्ग कधीच जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन करु शकत नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.

निवडणुकीत योग्य जागा दाखवतील

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पुण्यात अजित पवारांचे झालेले स्वागत हे पक्षाने सांगितल्यामुळे झाले आहे. ते काही उत्स्फूर्तपणे झाले नाही असे सांगताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे म्हणून मोठा पराक्रम केला आहे का? म्हणून स्वागत केले जात आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र अशा पराक्रमातला लोक निवडणुकीत योग्य जागा दाखवतील असे बावकुळेंनी म्हटले आहे.

मी एकनंबरच - भुजबळ

मी पवारांच्या नजरेत कायमच एक नंबर आहे, काळजी करु नका, असे म्हणत छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझा फक्त चंद्रशेखर बावनकुळेंवर डोळा आहे. मला नंबर वन राहण्यासाठी विरोधी पक्षनेते पदाची गरज नाही, ते पद मी चांगल्या पद्धतीने गाजवले आहे, हे सर्वांना माहिती आहे, नवे वाद का उकरुन काढताय असेही यावेळी भुजबळांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...