आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप-शिवसेना युती घट्ट आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीबाबत होत असलेल्या चर्चांबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पाथर्डीतून पंकजा मुंडे यंदा विधानसभा लढणार का, या प्रश्नावर पक्ष जी जबाबदारी देईल. ती पार पडेल, असे विधान पंकजा मुंडेंनी केले आहे. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोण कुठून लढणार याबाबत मला अधिकारच नाही. त्याचा निर्णय वरिष्ट घेतील. त्यामुळे याबाबत काय बोलणार, असे म्हणत बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंवर जास्त बोलण्याचे टाळले.
184 मते पुन्हा मिळतील
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बहुमत चाचणी झाल्यास 184 मते पुन्हा मिळतील, हा विश्वास आम्हाला असल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यामुळे इतर कोणाचीही मदत घेण्याचा प्रश्नच येणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले. भाजप-शिवसेना युती घट्ट आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
वैयक्तिक टिका नको
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार. मात्र वैयक्तिक टिपाटिप्पणीला महत्त्व द्यायला नको. तुम्ही सभांमध्ये तुमचे धोरणे मांडा, महाराष्ट्राचे व्हिजन मांडा मात्र वैयक्तिक टिका करणाऱ्यांना भाजप निपटवण्यास सक्षम आहे. शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दुप्पटीने मदत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी-भाजपची चर्चा का?
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संबंधित वृत्त
शरद पवारांचा B प्लॅन
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.