आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर विखारी टीका:म्हणाले - त्यांना नामर्द,षंढ ही भाषा शोभत नाही; त्यांच्यात मर्दानगी नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय राऊत कैद्यांकडून भाषा शिकून आले 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सरकारमधील मंत्री बेळगावात गेले नाही म्हणजे सरकार षंढ ओह ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालविण्याची धमक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशी आहे हे राऊतांना माहित आहे.

नेमके बावनकुळे काय म्हणाले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कारागृहात राहून आले आहेत. तेथील कैद्यांकडून राऊत ही भाषा शिकून आले आहेत. म्हणून आमदारांबद्दल आणि सरकारबद्दल असे शब्द बापरत आहे. मात्र राऊतांना महाराष्ट्राची संस्क़ती माहित नाही, आपल्या राज्यात असे वाक्य पचवले जातात का? जनता ही वाक्य ग्रहन करते का हे संजय राऊत यांनी कळले पाहिजे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

संजय राऊतांचा गंभीर आरोप:दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही
काय म्हणाले होते राऊत वाचा सविस्तर

ठाकरेंची भूमिका काय होती?

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे सामाजिक वातावरण अशांत करुन होत नाही. यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करुन होणार नाही. अडीच वर्षे सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांची सीमाप्रश्नावर काय भूमिका होती, त्यांनी काय पुढाकार घेतला.

सीमाप्रश्नी बावनकुळेंचा सल्ला

सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना कर्नाटक आणि महाराष्ट्राने जनतेशी खेळू नये, शेवटी एसटी, आणि गाड्या फोडणे हे लोकशाहीचे लक्षण नाही. सरकार कुणाचेही असले तरी त्यांनी गोटा मारला तर आपण त्यांना वीट मारायची यापेक्षा महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात तात्काळ निकाली निघावे यासाठी प्रयत्न करावे. केवळ मारपीट किंवा तणाव निर्माण करण्यापेक्षा आपण कायदेशीर मार्गाने पुढे जायला हवे असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...