आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या ५ सदस्यांविरोधात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या न्यायालयात या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पाचही आरोपींविरोधात बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअन्वये गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावर देशविघातक कृत्ये, विविध गटांत वैमनस्य निर्माण करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. इस्लामी कट्टरवादाचा पुरस्कार करणाऱ्या या संघटनेच्या शंभरहून अधिक सदस्यांना गेल्यावर्षी देशभरात टाकलेल्या छाप्यांत अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यांत ‘पीएफआय’च्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.