आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरनाईकांवर राज्य सरकार मेहरबान:राज्य सरकारची शिवसेना खासदार प्रताप सरनाईकांवर कृपा, ठाण्यातील इमारतीचा दंड माफ केला जाण्याची शक्यता

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अडचणीत सापडले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. आज दुपारी मुंबईत मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. यामध्ये विविध विषयांवरील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक यांना दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची असल्याची शक्यता आहे. राज्य सरकार प्रताप सरनाईकांवर मेहेरबान असल्याचे दिसत आहे.

ठाकरे सरकारकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव मांडू शकते. हा प्रस्ताव मंजूर झाला तर अशाप्रकारे एखाद्या आमदरासाठी विशेष निर्णय घेण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असणार आहे.ठाकरे सरकारकडून सरनाईक यांच्या छाबय्या विहंग या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेशही देण्यात येऊ शकते. त्यामुळे ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार का कृपा दाखवत आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.

का अडचणीत सापडले होते प्रताप सरनाईक?
प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक हे अडचणीत सापडले होते. त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. याचे कारण म्हणजे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. यासोबतच अभिनेत्री कंगना रनोट हिच्या विरुद्धही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत कारवाई करण्यात आली होती. ईडीने प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता व कार्यालयांवर छापे टाकले होते. 'टॉप्स सिक्युरिटी' घोटाळ्याच्या प्रकरणातही प्रताप सरनाईकांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा विहंग सरनाईकची ईडीने चौकशी केली गोती. प्रताप सरनाईक यांच्या कथित घोटाळ्यांविरोधात आवाज उठवण्यात भाजप नेते किरीट सोमय्या हे आघाडीवर होते.

बातम्या आणखी आहेत...