आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांनी बाप्पाला दिला निरोप:निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा होत असल्याने व्यक्त केली आनंदाची भावना

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहकुटुंब आले होते. भुजबळ हे मुंबईतील अंजिरवाडी, माझगाव येथील गणेशोत्सवात सहभागी झाले.

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या विघ्नानंतर राज्यात यंदा निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी सकाळपासून सर्वत्र ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे.

विविध पक्षातील राजकारण्यांकडून आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेते छगन भुजबळ यांनी देखील सहकुटुंब बाप्पाची आरती करत गणरायाला निरोप दिला. यावेळी त्यांनी कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ, अखिल अंजीरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार मानाच्या गणपतींच्या दर्शनाला

दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत.शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ व काही सार्वजनिक मंडळाचे दर्शन घेत आरती केली.

बातम्या आणखी आहेत...