आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे (एआयसीटीई) कार्यालय मुंबईतून स्थलांतरित केले जाऊ नये, तो निर्णय थांबवावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात केली आहे.
'एआयसीटीई' चे मुंबईतील पश्चिम विभागीय कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात सूचना पत्रही काढण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतरामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या कार्यालयाचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी भूजबळांनी आज सभागृहात केली.
विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना
छगन भुजबळ यांनी आज सभागृहात एआयसीटीईच्या कार्यालयाच्या स्थलांतराबाबत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. यामध्ये ते म्हणाले की, एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
विविध तंत्रशिक्षण शिक्षणक्रम, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम एआयसीटीई अंतर्गत येत असतात. अशावेळी प्रवेश क्षमतेपासून अन्य परवांग्यांशी निगडित बाबी या विभागांतर्गत येतात. विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यात आले तर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असून त्यांच्यात नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन हा निर्णय मागे घेऊन कार्यालयाचे स्थलांतर थांबविण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी सभागृहात केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.