आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजोबा नातू वाद:पार्थ पवारांविषयी छगन भुजबळ म्हणतात, 'नया है वह', पवार कुटुंबात सध्या काय सुरू आहे याविषयीही केले स्पष्ट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राजकारण सुशांतसिंह आत्महत्या केस संदर्भात तापले आहेत. आता यामध्ये पार्थ पवारविषयी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने फोडणी घातली आहे. पवार कुटुंबातील वादामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारले. यानंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांना पार्थ पवारांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर 'नया है वह' असं ते म्हणाले. यासोबतच पवार कुटुंबातील सध्याच्या परिस्थितीविषयीही त्यांनी भाष्य केलं.

पवार कुटुंबात सध्या काय सुरू आहे

भुजबळ म्हणाले की, ' पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. या प्रकरणामुळे अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सर्व जण एकत्रित आहोत. ' असं म्हणत छगन भुजबळांनी कुटुंबातील कलहाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

0