आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्येत बिघडली:राष्ट्रवादी काँग्रसचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळीच मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आता भुजबळ अॅडमिट झाल्याचे समजते.

भुजबळांना काय झाले?

छगन भुजबळ यांना आज सकाळी मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचे समजते. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उपचार घेतल्यानंतर आज सायंकाळपर्यंतच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, असे समजते. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवारांची तब्येतही ठीक नाही. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या काळात त्यांनी शिर्डीच्या शिबिरालाही हजेरी लावली. अखेर त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काही दिवसांपासून दगदग

छगन भुजबळ हे सतत कार्यक्रमात व्यस्त असतात. गेल्या काही दिवसांपासूनही त्यांचे कार्यक्रम सुरूच होते. शिवाय शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातही ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गेलेले भाषण चांगलेच गाजले. गुजरातला फॉक्सकॉन, तर महाराष्ट्राला पॉपकॉर्न मिळाले. गेल्या 8 वर्षांपासून लोक मोदींनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाची वाट पाहतायत. राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करू पाहत आहेत, पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले - शाहू - आंबेडकर आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरूनच करावा लागेल, अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली होती.

बातम्या आणखी आहेत...