आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार:शरद पवार यांची कोणाला ॲलर्जी असण्याचे काही कारण नाही? छगन भुजबळांचे गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात दोन ते अडीट महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी, अनेक कर्मचारी अजूनही त्यांच्या मागण्यांसाठी ठाम आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक केली यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर राहण्यासाठी आवाहन केल आहे. यावरुन अनेक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
शरद पवारांची अ‍ॅलर्जी कुणालाच असण्याचे कारण नाही. कारण आज महाराष्ट्रातील नाही तर देशातील असे नेते आहेत त्यांच्या मताला, अनुभवाला किंमत आहे. राज्यात जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना काळजी वाटणे स्वाभावीक आहे.
मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मार्गदर्शन करण्याचे शरद पवारांच काम आहे. त्यामध्ये अ‍ॅलर्जी असण्याचे इतरांना कारण नाही. महाविकास आघाडी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न करेल.

पडळकर काय म्हणाले होते?
कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. सरकारच्या महसूलात घट आणली आणि त्यामुळे शरद पवार यांना या विषयाबाबत खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडली असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...