आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर विभागात मात्र सर्वाधिक उपयुक्त जलसाठा:उन्हाळ्याच्या तोंडावर जलसाठ्यांत घट; गतवर्षीपेक्षा यंदा 3 टक्के पाणी कमी

विनोद यादव | मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिना लागला तसा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, अजून कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच राज्यातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गेल्या शनिवारपर्यंत राज्यातील जलाशयांमध्ये २.९८ टक्के कमी पाणीसाठा होता. गतवर्षी राज्यातील जलाशयांमध्ये ६८.४६ टक्के पाणीसाठा होता. तर यंदा तो ६५.४५ टक्के आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग अव्वल, पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा : जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागात शनिवारपर्यंत सर्वाधिक ७२.३८ टक्के (९१८५.६८ दशलक्ष घनमीटर) उपयुक्त पाणीसाठा होता. तर पुणे विभागात सर्वात कमी ६०.३९ टक्के (९१८५.६८ दशलक्ष घनमीटर) उपयुक्त पाणीसाठा आहे. महाराष्ट्रात एकूण ३२६७ धरणे आहेत. यात २,८६८ लघु, २५८ मध्यम आणि १४१ मोठ्या धरणांचा समावेश आहे. राज्यातील या सर्व धरणांतील उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४०,७७९.२२ दशलक्ष घनमीटर आहे. शनिवारपर्यंत या धरणांमध्ये सुमारे २६,६९२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता.

विभागनिहाय उपलब्ध जलसाठा अमरावती ६१.४७ % (२५०४.६५ दलघमी) कोकण ६६.१२ % (२३२०.७५ दलघमी) नागपूर ६७.०१ % (३०८७.१३ दलघमी) नाशिक ७०.९२ % (४२५७.९८ दलघमी)

वर्ष उपयुक्त क्षमता आज उपलब्ध
पाणी पाणी (%)
2019 40897.95 13160.91 32.18 %
2020 40897.95 23838.65 58.29
2021 40807.16 24898.41 61.01 %
2022 40781.09 27999.41 68.66 %
2023 40779.22 26692.0 65.45 %
( स्रोत : जलसंपदा विभाग, ११ मार्चपर्यंत उपयुक्त पाणीसाठा)

बातम्या आणखी आहेत...