आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रकांत पाटलांच्या बाबरी वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांची भूमिका कळून येते असे म्हणत बाळासाहेबांचं नाव पुसले जाणार नाही, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. पुन्हा जुना वाद उकरून काढण्याचे काय कारण? असा सवालही त्यांनी विचारला.
बाबरी मशीद पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, त्यांना याविरोधात केस नको होती म्हणून ते आमचा संबंध नाही असे म्हणतात. त्यावेळी बाळासाहेब मोठ्या धीराने पुढे आले. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे त्यांची भूमिका समजून येते, असे छगन भुजबळ म्हणालेत.
पुढे भुजबळ म्हणाले, त्यावेळी बाळासाहेब मोठ्या धीराने पुढे आले होते. त्याच गेाष्टी पुन्हा उकरून काढण्याचे काय कारण आहे? याने बाळासाहेबांचं नाव पुसलं जाणार नाही असेही छगन भुजबळ म्हणाले.
नक्की प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.
भाजपविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावर मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली.
संबंधित वृत्त
नव्या वादाला तोंड:बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य; बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.