आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागँगस्टर छोटा राजनला मुंबई कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतील कथित सदस्याच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या टोळीचा कथित सदस्य अनिल शर्मा याची अंधेरी उपनगरात 2 सप्टेंबर 1999 रोजी राजनच्या गुंडानी गोळ्या झाडून हत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणातील गँगस्टर छोटा राजनला दोषमुक्त करण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारली होती. मात्र, सत्र न्यायालयाचा सविस्तर आदेश मंगळवारी उपलब्ध झाला.
दाऊद टोळीचा कथित सदस्य अनिल शर्मा याची अंधेरी उपनगरात 2 सप्टेंबर 1999 रोजी गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप या खटल्यातील फिर्यादी पक्षाने केला होता. गँगस्टर दाऊद आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांमध्ये सुरू असलेल्या शत्रुत्वामुळे अनिल शर्माची हत्या झाल्याचा दावाही फिर्यादीने केला होता.
अनिल शर्मा कथितपणे 12 सप्टेंबर 1992 रोजी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीचा भाग होता. दाऊदच्या टोळीने प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्याला मारण्यासाठी गोळीबार केला होता.
सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्या (राजन) विरुद्ध फिर्यादीकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांच्याकडे फक्त तक्रारदाराने दिलेली माहिती आहे. अशा परिस्थितीत, याचिकाकर्त्याला आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशा पुराव्यांचा अभाव आढळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.