आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनामुळे मृत्यू:गँगस्टर छोटा शकीलच्या बहिणीचा ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हमीदा फारूक सय्यादमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

गँगस्टर छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हमीदा फारूक सय्याद यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 60 वर्षीय सय्याद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या त्यांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये पती आणि आपल्या तीन मुलांसोबत राहत होत्या.

एका महिन्यात दुसऱ्या बहिणीचा मृत्यू

यापूर्वी मे महिन्यात छोटा शकीलची अजून एक बहीण फहमीदाचा मृत्यू झाला होता. 50 वर्षीय फहमीदाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. फहमीदा आधी दुबईत राहत होती, 2006 मध्ये ती मुंबईत शिफ्ट झाली होती.

0