आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:उद्धव यांच्या याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांचा नकार

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी आणि दोन मुलांच्या कथित “उत्पन्नापेक्षा अधिक’ संपत्तीची सीबीआय आणि ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीपासून स्वत:ला बाजूला केले.

याचिकाकर्त्या गौरी(३८) आणि त्यांचे वडील अभय भिडे(७८) यांनी आपल्याला काहीही समस्या नसल्याचे सांगितले. भिडे यांनी आणीबाणीदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे साप्ताहिक छापले होते. भिडे अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेल्या दादरचे रहिवासी आहेत. सिडकोने प्रबोधन प्रकाशनला(सामना वृत्तपत्राची मालकी व प्रकाशक) दिलेल्या भूखंडाबाबत याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात नमूद केले की, कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान ठाकरे यांची कंपनी प्रबोधन प्रकाशन प्रा.लिमिटेडने ४२ कोटी रुपयांची उलाढाल आणि ११.५ कोटी रुपयांचा नफा कमावून “शानदार कामगिरी’ दाखवल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...