आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी,’ हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून एकनाथ शिंदे वरळीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये वरळीतून निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत ८९,२४८ (६९.१४ टक्के) मते मिळाली होती. मात्र, उद्धव ठाकरेंसोबतची राजकीय युती तुटल्यापासून भाजपने वरळीची जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर शक्तिप्रदर्शन करून ही जागा जिंकण्याची पायाभरणी करणार आहेत. या वेळी दोघेही १० हजार लोकांच्या एका छोट्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. वरळीची जागा जिंकण्याची तयारी फार पूर्वीपासून सुरू केल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.