आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूमिपूजन:एमआयएम आणि मुख्यमंत्री हे राम मंदिराचे ई-भूमिपूजन करण्याची मागणी करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे - देवेंद्र फडणवीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिराचं भूमी पूजन हे त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ही कोट्यावधी हिंदू लोकांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मंदिराचे प्रत्यक्ष भूमिपूजन न करता ई-भूमिपूजन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत दिला होता. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया आली आहे. राममंदिराचे ई-भूमिपूजन करा ही मुख्यमंत्र्यांची मागणी आश्चर्यकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिराच्या संदर्भात तिथे भूमिपूजन होणार आहे. आम्ही जिथे जिथे आहोत तिथे हर्षोल्लासात आनंदोत्सव साजरा करु. पण ई-भूमिपूजन करण्याच यावी अशी काही जणांची मागणी आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सने भूमिपजून करावे. एमआयएम आणि मुख्यमंत्री एकच गोष्ट का म्हणता याचे मला आश्चर्चय वाटतेय असे फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले की, हे भूमिपूजन पूर्ण नियमांने केले जाईल. यामध्ये कुठेही गर्दी होणार नाही. राम मंदिराचं भूमी पूजन हे त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ही कोट्यावधी हिंदू लोकांची मागणी आहे. सर्व प्रकारचे कोरोना नियम पाळून हे भूमिपूजन केलं जाईल. मुख्यमंत्री आणि एमआयएनचं ई-भूमिपूजन करायचं मत असलं तरी कोट्यावधी हिंदूंच मत आहे की, पंतप्रधानांनी जागेवर जाऊन भूमिपूजन करावं. तर सर्व नियम पाळून हे भूमिपूजन केलं जाणार आहे.