आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिसले सरांचा सत्कार:'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसले सरांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांनी कौतुकाची थाप मारली

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी डिसले यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला.

रणजितसिंह डिसले सरांना 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली. तसेच, महाराष्ट्राला आपला अभिमान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री अॅड.वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser