आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंगळुरमध्ये दाखल, कर्नाटकात भाजपचा प्रचार करणार, म्हणाले- डबल इंजिन सरकार येणार

बंगळुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. सर्वपक्षीयांकडून निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटक निवडणुकीत ऑन फिल्ड उतरले आहेत. आता भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणार असा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आणि उद्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. तसेच कापू आणि उडुपीमध्ये होणार भाजपाच्या रोडशोसुद्धा ते सहभागी होतील. सोमवारी उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरालाही भेट देऊन संध्याकाळी महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती आहे.

कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

कर्नाटक निवडणुका 2 दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांकडून याठिकाणी मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज बंगळुरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

देशासाठी महत्त्वाची निवडणुक

याठिकाणी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, युतीची प्रचार करायला मी याठिकाणी आलेलो आहे. याठिकाणी मराठी माणसांचे 103 वर्षे जुने महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांची मी भेट घेणार आहे. मराठी लोकांनी भेटणार आहे. भाजपसाठीच नाही तर देशासाठी ही महत्त्वाची निवडणुक आहे. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरुन 5 व्या क्रमांकावर आलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात डबल इंजिन सरकार येणारच. कर्नाटकमधील मतदार भाजपला मतदान करुन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.