आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर फडतूस म्हणत टीकास्त्र डागले होते. यानंतर भाजपकडून त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. यानतंर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तुमच्या काळात कमी कांड झाले का? दोन मंत्री जेलमध्ये गेले, देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याइतके तुमच्याकडे काय आहे, वडीलांच्या पुण्याई सोडली तर तुमचे कर्तृत्व शुन्य आहे, असा टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात गुंडागर्दी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या काळात कमी कांड झाले का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ज्यांच्या अडीच वर्षांच्या कार्ळकाळात 2 मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले. पोलिसांच्या आणि गृहखात्यांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले. विरोधात कुणी बोलले तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. नारायण राणेंना जेपवनावरुन उठवले होते, कंगनाचे घर तोडले, पत्रकाराला आणि केतकी चितळेसह हनुमान चालीसा म्हटली म्हणून आमदार आणि खासदार असलेल्या राणा दामप्त्याला जेलमध्ये टाकले. ही किती गुंडागर्दी त्यांच्या काळात होती हे ते विसरले का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचे रान केले, घरादारावर तुळशीपत्र ठेवले, त्यामुळे शिवसेना मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आले आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांबद्दल बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. काल ठाण्यात नैराश्य पाहायला मिळालं. त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप संयम बाळगला, त्यांना फडतूस म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांना उद्धट किंवा उद्धस्त ठाकरे म्हणाले नाही. ही संस्कृती आणि परंपरा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून हा सर्व खेळ सत्तेच्या खुर्चीसाठी आहे. सहानुभुती मिळविण्यासाठी हे सर्व सुरू आहे. बाळासाहेबांच्या पुण्याई शिवाय उद्धव ठाकरेंचे वेगळे असे काय अस्तित्व आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे, त्यांच्यावर बोलण्याइतके तुमच्याकडे काय आहे. योग्यवेळी योग्य उत्तर देऊ. उद्धव ठाकरेंनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.