आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्याच्या परवानगीत हस्तक्षेप केला नाही:अन्यथा आमचा मेळावा शिवतीर्थावर झाला असता- मुख्यमंत्री; बीकेसी मैदानाची पाहणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवतीर्थावर सभा व्हावी ही आमच्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती; पण मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी कुठलीही परवानगी देताना हस्तक्षेप केला नाही. मी हस्तक्षेप केला असता तर आमचा मेळावा शिवतीर्थावर झाला असता अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर दिली.

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मैदानाची पाहणीसाठी सीएम शिंदे बीकेसी मैदानावर आले. त्यावेळी त्यांनी सूरक्षा आणि इतर सोई-सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सीएम शिंदे म्हणाले, सदा सरवणकर यांनीही शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली. ठाकरे गटानेही परवानगी मागितली. दोघांनाही प्रशासानाने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अंदाज पाहता परवानगी नाकारली. ते हायकोर्टात गेले, त्यानंतर त्यांना परवानगी दिली गेली.

मैदानापेक्षा विचार पुढे न्यायचेय

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सुप्रीम कोर्टात जावे ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण राज्याचा मी मुख्यमंत्री आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे बीकेसीमध्येच दसरा मेळावा आयोजित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. मैदान हे काय आणि ते काय? शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि आमचे काम लोकापर्यंत जावे हाच आमचा उद्देश आहे म्हणून मैदान मला मिळेल की, त्यांना मिळेल याचा आम्ही विचार केला नाही.

सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दसरा मेळावा शांततेत व्हावा यासाठीच आम्ही आमच्या सहकाऱ्यांनाही सांगितले की, हायकोर्टाचा निकालाचा आदर करूया व सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही.

दसरा मेळावा जल्लोषातच

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गृहविभागाचे अधिकारी काम करीत आहेत. कामाची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घेतली आहे. त्यामुळे दसरा मेळावा जल्लोषात होईल.

गृहविभाग सक्षम

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचा गृहविभाग सक्षम आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षेबाबात पाहत आहेत. पोलिस त्यांचे काम करीत आहे. ते सक्षम आहे, ते काळजी घेत आहे, त्यामुळे कसली काळजी मला नाही. दसरा मेळावा बीकेसीचा आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा शांततेत व्हायला हवे. कुठलीही अनुचित घटना घडू नये. दोन्ही मेळाव्यात येणाऱ्या कुणाचीही गैरसोय होऊ नये याबाबत मी पोलिस दलालाही सूचना दिल्या आहेत.

फडणवीसांचे आदेश

तत्पुर्वी आजच मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे त्यांची सूरक्षाही वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची सूरक्षा वाढवा. वारंवार येणाऱ्या धमक्यांचा स्त्रोत शोधा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...