आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदेंनी घेतले राज ठाकरेंच्या बाप्पांचे दर्शन:युतीचा श्रीगणेशा होणार असल्याच्या चर्चेला उधाण; CM म्हणाले - राजकीय चर्चा झाली नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युतीचा श्रीगणेशा होणार असल्याच्या चर्चेला उधाण
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले राज ठाकरेंच्या बाप्पाचे दर्शन, पण संभाव्य युतीवर भाष्य करणे टाळले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गुरुवारी (१ सप्टेंबर) गणपतीचे दर्शन घेतले. गणेश दर्शनासाठी आलो होतो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. या भेटी युतीचा श्रीगणेशा असल्याचा तर्क लावला जात आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच राज ठाकरे यांचा निवासस्थानी आले होते. ‘आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. या वेळी त्यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी निघाल्या,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची ही भेट ५० मिनिटांची होती. मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर या वेळी हजर होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत अलीकडे भेट घेऊन चर्चा केली आहे.

राज ठाकरे सभांद्वारे करतील विराेधकांचे नुकसान
महापालिका निवडणुकांमध्ये एक ठाकरे बरोबर असले तर भाजपला ही निवडणूक सोपी जाणार आहे. त्यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊ शकतात. राज ठाकरे यांच्याकडे मते अधिक नसली तरी त्यांच्या सभा विरोधकांचे मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे महत्त्व वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...