आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंनी 'ब्रिज कॅंडी'त घेतली पवांराची भेट:सीएम म्हणाले - पवारांची प्रकृती चांगली, ते राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहणार

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्याने मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पोहचले. त्यांनी रात्री आठ वाजता पवारांना भेटून प्रकृतीची विचारपूस केली.

दुपारी फोनवरुन विचारपूस

शरद पवार यांना न्युमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी ब्रिज कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारीच फोनवरून घेतली होती. त्यानंतर ते रात्री रुग्णालयात पवारांची भेट घेण्यासाठी आले आहेत.

पवारांची प्रकृती चांगली - सीएम

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मी त्यांच्याशी बोललो. त्यांचा न्युमोनिया बरा झाला आहे. ते माझ्याशी अगदी चांगले बोलले. त्यांची प्रकृती चांगली आहे.

शिर्डीच्या शिबिराला पवार उपस्थित राहणार

सीएम शिंदे म्हणाले, मला त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या शिबिराला मी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येणार आहे. चाचण्या करून अहवाल पाहून त्यांना डिस्चार्ज मिळेल. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे या सदिच्छा देण्यासाठीच मी आलो होतो.

बातम्या आणखी आहेत...