आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण प्रकरण:मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण प्रकरणाचे गांभीर्यच नाही, फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही : लहू चव्हाण

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण (२२) या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी शिवसेना चांगलीच बॅकफूटवर गेली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार असलेले मंत्र्याचे नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विरोधी पक्ष भाजपने शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जाेरदार हल्ला चढवला आहे, तर सरकारातील घटक पक्ष असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत.

नागपूर येथे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांना अनेक सवाल केले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ध्वनिफीत ऐकावी, यातला आवाज कुणाचा याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती नीट घ्यावी, म्हणजे कोण कोणाला जीवनातून उठवत आहे हे त्यांना कळेल. त्यांच्या बोलण्यातून यासंबंधीचे गांभीर्य दिसून आले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केली असून याप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स पुरेशा स्पष्ट असल्याने त्या आधारावर पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे, परंतु ते कुणाच्या तरी दबावात आहेत, असे फडणवीस म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. याप्रकरणी मंत्र्याचे नाव जेव्हा रेकाॅर्डवर येईल तेव्हा आम्ही राजीनाम्याशिवाय गप्प बसणार नाही. पूजा चव्हाणचे शवविच्छेदन अहवाल दोन-दोन वेळा का बदलावे लागले, अशी विचारणा पाटील यांनी रविवारी पुण्यात बोलताना केली.

शिवसेनेने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांनी तपासाची दिशा स्वत: ठरवली आहे. म्हणून त्यांच्या पद्धतीने तपास व्हावा, अशी ते मागणी करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. पूजाच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे हे सरकार शोधून काढेल, पण काही वेळेला अशा प्रकरणाचे राजकीय भांडवल केले जाते. केवळ बदनामीसाठी राजकारण करू नका, असे शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात हे याप्रकरणी बोलले आहेत. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाहीत, अशी ग्वाही देत या दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या मागे खंबीर उभे असल्याचे एक प्रकारे सूचित केले आहे.

पुणे पोलिसांचा प्राथमिक अहवाल आज मिळणार

सोमवारी याप्रकरणी पुणे पोलिसांचा प्राथमिक अहवाल पोलिस महासंचालकांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. १ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही : लहू चव्हाण

मला सहा मुली आहेत, पूजा माझ्यासाठी मुलगी नव्हती तर मुलगा होती, तिने स्वत:च्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून मला पोल्ट्री सुरू करुन दिली होती. घरचे सगळे व्यवहार तिच पहात होती तिच्या अचानक जाण्याने आम्हाला धक्का बसला आहे मात्र तिच्या जाण्यानंतर आमची बदनामी सुरू असून ही बदनामी थांबवावी ऑडिओ क्लिपमधील आवाज तिचा नाही असे पूजाचे वडील लहुदास चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...