आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई वीज खंडित:मुंबईसह महानगरात झालेल्या वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. या प्रकारामुळे काही काळासाठी गोंधळ उडाला होता. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

आज झालेल्या ग्रीड फेलचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालये, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचे चित्र होते.

भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. तसेच, रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser