आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या शिवसेनेला जोगेंद्र कवाडे गटाची साथ:मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांनी केली युतीची घोषणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाची शिवसेना आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी यांच्यातील संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी बरोबर (पीआरपी) युतीची घोषणा करत बाजी मारली. एकनाथ शिंदे आणि प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे यांच्या भगव्याला निळ्या झेंड्याची साथ असणार आहे.

यासंदर्भात बुधवारी दुपारी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना कवाडे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमचा विचार असेल.

कवाडे गटाचे अस्तित्व अल्प रिपाइंमध्ये अनेक गट आहेत, पैकी कवाडे एक गट आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्ष असे या गटाच्या पक्षाचे नाव आहे. कवाडे गटाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके राज्यात नगरसेवक आहेत. विदर्भात या गटाचे थोडफार अस्तित्व आहे.

बातम्या आणखी आहेत...