आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरेंची शिवतीर्थावर खलबतं:पाऊण तासाच्या भेटीनंतर शिंदे म्हणाले - भेट राजकीय नव्हतीच, मग नांदी कसली?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाऊण तास त्यांच्यात खलबतं झाली. यावर ''हो मी राज ठाकरेंची भेट घेतली. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आणि राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो. आमची राजकीय चर्चा झाली नाही ही भेट राजकीय नव्हती.'' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना भेटण्याचा सपाटा लावला. यामुळे राज्यात नवीन समिकरणे जुळण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता याच शक्यतेत आता आणखी भर पडली आहे.

या आहेत शक्यता

तूर्तास मुख्यमंत्री शिंदे जरी भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असे म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संभाव्य पडझड टाळण्यासाठी जनतेचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणूक हेही भेटीचे कारण असू शकते अशी शक्यताही राजकीय सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मैफल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मैफल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर आनंदाचे वातावरण आहे. याचनिमित्ताने मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्याकडे मी गेलो. तेथे गणपतीचे दर्शनही घेतले. बाकी काहीच नाही. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. मागे त्यांची शस्त्रक्रिया घेतली. त्यानंतर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. शस्त्रक्रियेनंतर तेव्हाच भेट घेणार होतो पण जमले नाही.

राजकीय चर्चा झाली नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्यात राजकीय चर्चा काहीच झाली नाही, त्यामुळे राजकीय नांदी आणि राजकीय समीकरण जुळवले असे म्हणता येणार नाही. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते त्यामुळे त्यांना भेटलो.

राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा

मुख्यमंत्री म्हणाले, चर्चेत आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे आणि मी बाळासाहेबांसोबत काम केले आहे. मी महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री आहे हे पोस्टर जरी असले तरी शेवटी हे जनता ठरवत असते. कमी वेळात आम्ही मोठे निर्णय घेण्याचे धाडस केले आहे. राजकीय चर्चा माझी आणि राज ठाकरे यांची झाली नाही हे मी स्पष्ट करतो असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...