आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद शपथविधी:मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर 8 आमदारांना देण्यात आली शपथ, विधीमंडळात साध्या पद्धतीत झाला सोहळा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह इतर 9 आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात साध्या पद्धतीत पार पडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरेंसह इतर आमदारांना शपथ दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्यपालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

शपथविधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य

शिवसेनेमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शशिकांत जयवंतराव शिंदे आणि अमोल रामकृष्ण मिटकरी, काँग्रेसमधून राजेश धोंडीराम राठोड, तर भाजपमधून गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील आणि रमेश काशिराम कराड यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...