आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांनी सुनावले:'मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही, मंदिरं उघडली जावीत ही त्यांचीही मनापासून इच्छा आहे...', संजय राऊतांची विरोधकांवर टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच धार्मिक स्थळं ही बंद आहेत. जनतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद असल्याचं राज्य सरकारने म्हटलं असलं तरीही विरोधकांकडून सातत्याने मंदिर खुली करण्याची मागणी केली जात आहे. आजही राज ठाकरेंनी मंदिर खुली करण्याची मागणी केली. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी विरोधकांना सुनावले आहे.

राऊत म्हणाले की, मंदिरं खुली केली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने मंदिर खुली करण्याची मागणी केली जात होती. यालाच संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राऊत बोलताना म्हणाले की, कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. त्यामुळे विचार करून पाऊलं उचलावी लागणार आहेत. विरोध करायचा म्हणून विरोध नको. संभाजीनगरचे खासदार रस्त्यावर उतरले यानंतर तिथे सगळा फज्जा उडालेला दिसतो असा उल्लेखही त्यांनी केली आहे.

बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का?
बदल्यांच्या विषयावर विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. यावर राऊत म्हणाले - विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करत असल्याचा आरोप केला. मात्र नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये असं घटनेत लिहिलेलं आहे का? असा सावाल राऊतांनी केला आहे. तसंच बदल्या करु नका असं कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलं असाही सवाल त्यांनी केला आहे. बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का? बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का? असा सावालही राऊतांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही अशी टीका सातत्याने केली जात आहे. यावर संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यभर संपूर्ण मंत्रिमंडळ फिरत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे सर्व टाळता यावे यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत असंही राऊतांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करायचे हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवर बसून जास्त काम केले जाऊ शकते. डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच असल्याचंही राऊत म्हणाले.