आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:मालाड इमारत दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली. बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मालाडमधील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत रात्री 11.10 वाजेच्या सुमारास दुसऱ्या एका इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, या 11 जणांमधील 9 जण एकाच कुटुंबातील आहे. यामध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...