आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:ओबीसी आरक्षणाला धक्कान लावता मराठा आरक्षण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतूद : भुजबळ

मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी महाधिवक्त्यांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका-कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी महाधिवक्ता यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मंगळवारी केले.

ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतूद : भुजबळ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी हे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. तसेच मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही. ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतूद करून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.