आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:महाराष्ट्र आणि बिहारमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी कुणीही या प्रकरणाचा वापर करु नये, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्याने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. यावरुन सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मुंबई पोलिस हे प्रकरण हाताळण्यासाठी कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही या बाबत कोणतेही पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. मात्र या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका' असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर शुक्रवारी या प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेतली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी जनभावना आहेत. मात्र, राज्य सरकारची तशी इच्छा असल्याचे दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. यामुळे किमान ईडीने या प्रकरणात लक्ष घालावं' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.

0