आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराचा दावा:सरकार स्थापनेपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी आमदारांना वेळ दिलाच नाही, भाजप आमदार प्रशांत बंब यांचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार स्थापनेपासून आम्हाला वेळच दिला नाही

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, मात्र दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. अशी तक्रार करत औरंगाबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी फेसबुक लाईव्ह करून कृपया आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

कृपया आम्हाला भेट द्या
प्रशांत बंब हे ट्विटरवर व्हिडिओ करत म्हणाले की, 'कोरोना सारखे संकट असो, राज्यातील विविध विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, दुष्काळाचे प्रश्न, या सर्वांवर आम्हाला बोलायचे आहे, यावर आम्हाला मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया मुख्यमंत्री आम्हाला भेट द्या, आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी फेसबुक लाइव्ह करत केली आहे.

सरकार स्थापनेपासून आम्हाला वेळच दिला नाही
बंब म्हणाले की, सरकार स्थापनेपासून गेल्या दोन वर्षात विरोधी आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वेळच दिला नसल्याचा दावा केला आहे. ठाकरे सरकारच्या स्थापनेला आता जवळपास दोन वर्ष होत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन वर्षाच्या काळात विरोधी पक्षांच्या आमदारांना वेळच दिला नाही. एवढेच काय तर पत्रालाही त्यांचे उत्तर येत नाही. असेही बंब म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...