आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात मंदिरे उघडण्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. दरम्यान, भाजपकडून विद्यमान सरकारवर अनेक आरोप केले जात आहेत. वास्तविक पाहता राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 'राज्यातील आरोग्य केंद्रे बंद करुन मंदिरे उघडायची का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील देखील उपस्थित होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याबाबत राज्य सरकारची कोणतीच हरकत नाही. परंतु, सध्या मंदिरे जरी बंद असले तरी आरोग्य मंदिरे मात्र सुरु आहेत. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि आरोग्य केंद्र बंद करुन मंदिरे उघडू असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना केला. मंदिरे उघडणार पण टप्पाटप्प्याने त्यामुळे मंदिरे उघडण्यावरुन मुख्यमंत्र्यांना भाजपला अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे.
हिंदुत्वावरुनही भाजपला कानपिचक्या
हिंदुत्वावरुन भाजप आणि शिवसेना ही आमनेसामने येत असून एकमेंकावर टीकाटीप्पणी करतात. आम्ही केवळ घोषणाच देत नाही तर घोषणेच्या पलीकडे जात हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. 1992-1993 साली आम्ही हे दाखवून दिले आहे. डोंबिवलीचा विकास करण्यासाठी या एकत्र बसा, जे शक्य होईल ते देईन अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.