आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षणावर भाष्य:सरकार मराठा बांधवांच्या मागे खंबीरपणे उभे, यामुळे कृपया कुणीही रस्त्यावर उतरु नका, न्याय मिळवण्यासाठी सरकार कोर्टात भांडत आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या स्थिगितीची गरज नव्हती ती स्थगिती कोर्टाने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करु नका असे आवाहन केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी, मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कोर्टात भांडत आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घेतला होता. आपण तो मंजूर केला. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले ती आपण जिंकली. सुप्रीम कोर्टातली लढाई आपण लढत आहोत. सर्वोत्तम वकील आपण यासाठी दिलेले आहेत. वकील आपण वाढवलेले आहेत. कमी केलेले नाहीत. यासोबतच काही संस्था आणि काही व्यक्तीही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. कोर्टात अग्रुमेंट करायला आपण कमी पडलेलो नाही.

सुप्रीम कोर्टाचा निकाल अनाकलनीय

सुप्रीम कोर्टाने अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. ज्या स्थिगितीची गरज नव्हती ती स्थगिती कोर्टाने दिली आहे. या केसच्या सुनावणीवेळीही मी अनेक वेळा सर्व नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्समध्ये संवाद साधला. जेष्ठ विधीतंज्ञांशी आम्ही चर्चा केली. कोर्टासमोर बाजू मांडली तरीही हा निकाल असा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याविषयावर चर्चा केली जात आहे. असं ठाकरे म्हणाले.

कृपया रस्त्यावर उतरु नका

ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वांची मत लक्षात घेऊन पुढे काय करायचं, काय गाऱ्हाणं मांडायचं याविषयी चर्चा केली जात आहे. तसेच फडणवसांनीही मराठा समाजाच्या निर्णयात सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. मराठा बांधवाने आंदोलन करा, पण सरकार आपलं आहे, सरकार काम करत आहे मग का रस्त्यावर उतरायच? आपण एकत्र आहोत. तुमच्या मागण्या आम्ही मांडल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या हिरीरीने न्यायालयात मांडत आहोत. सरकार तुमच्यासाठी भांडत आहे. सर्व सूचना आम्ही घेत आहोत. यामुळे आंदोलन करु नका कारण सरकार आपलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे राहणार नाही

मराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे राहणार नाही. म्हणून आंदोलन मोर्चे करु नका. कोरोना काळात आंदोलन तर अजिबात करु नका. सरकार तुमच्या भावनेशी सहमत आहे असेही आवाहान मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवाना दिले आहे. एकजुटीने हा न्याय मिळावल्याशिवाय थांबायचं नाहीये. यामुळे कोरोना संकटकाळात जबाबदारीने वागा.

0