आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना उत्तर:'विरोधकांनी मेट्रो प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण योग्यवेळी त्यांना समर्पक उत्तर देऊ' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने जर्मन कंपनीकडून घेतले 545 दशलक्ष युरोंचे कर्ज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेडविषयीही भाष्य केले आहे. मुंबई मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. यावर योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले.

'मेट्रो कारशेडवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. यावर ठाकरे म्हणाले की, 'मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवली. यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या सर्व टीकेची उत्तरे आमच्याकडे आहे. पण त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे असे सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू.' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

जर्मन कंपनीकडून घेतले 545 दशलक्ष युरोंचे कर्ज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याविषयी बोलताना म्हटले की, 'जर्मनीच्या कंपनीकडून 545 दशलक्ष युरोंचे कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतले आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटत असल्याचे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी सोबत आहेत. हे राज्यातील जनतेच्या मेहनीचे फळ आहे.' असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...