आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री म्हणाले..:'विरोधीपक्षाकडून गलिच्छ राजकारण केले जातेय; तर राजीनामा दिला तो फ्रेम करायला नाही, तो स्विकारला आहे'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांवर वारंवार अविश्वास व्यक्त केला जात आहे

वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरुन अडचणीत सापडले आहे. त्यांनी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा स्वीकारला की नाही? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजीनामा दिला तो फ्रेम करायला नाही, तो स्विकारला आहे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अरुण राठोड यांच्या प्रकरणाविषयी बोलताना म्हणाले की, न्यायाने वागणे ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण केले जात आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवाडयेचे आहे यासाठी काम केले जात आहे. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असे सांगितले जात आहे. मात्र, तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे.

संजय राठोड यांच्या पत्रामध्ये काय?
संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला आहे, यामध्ये लिहिले आहे की, 'मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत सत्य बाहेर यावे. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी केली जात आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणे नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.'

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांवर वारंवार अविश्वास व्यक्त केला जात आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षाकडून पुजा चव्हाण प्रकरणावरुन केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय देणे होत नाही. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिलेल्या आहेत. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही.

तपास यंत्रणेवर विश्वास नाही का?

नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा होती. मग आता तुम्हाला याच तपास यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. तसेच मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांवर वारंवार अविश्वास व्यक्त केला जात आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पुढे मुख्यमंत्री विरोधी पक्षावर टीका करत म्हणाले की, 'तुमच्याकडे जे पुरावे असतील ते जरूर द्या. तुम्हीच तपास करा आणि तुम्हीच न्यायालये व्हा. तपास यंत्रणेची गरज काय?' असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...