आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीचा अनुभव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेअर केला त्यांचा वारीचा अनुभव, म्हणाले - कोरोनाचं संकट संपवण्यासाठी विठूरायाला घालणार साकडं

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधीत केलं. ते येत्या आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी जाणार आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, मी कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी विठूरायाला साकडं घालणार आहे. मुख्यमंत्री या नात्याने मी जाणार नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार आहे.

शेअर केला पंढरपूर वारीचा अनुभव 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना त्यांचा पंढरपूर वारीचा अनुभवही शेअर केला आहे. ते म्हणाले की, आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जाणार आहे. यापूर्वी मी वारी पाहिलेली आहे आहे. म्हणजे मी वारीमध्ये सहभागी झालेलो नसलो तरीही हेलिकॉप्टरमधून मी सर्व पाहिलं आहे. त्याचं मी पहावा विठ्ठल पुस्तकही तयार केलंय. यापूर्वी मी विठ्ठल मंदिरात जाऊन बघितलेला नाही, मात्र हेलिकॉप्टरमधून वारी टिपताना मला विठ्ठलाच्या विराट रुपाचं दर्शन झालंय. हेलिकॉप्टरमधून मी विठ्ठलाचं विश्वरूप पाहिलं आहे. हजारो वारकरी रिंगण करून विठ्ठलाचं नामस्मरण करत असतात. ते विठ्ठल नामात सर्व काही विसरुन दंग झालेले असतात. यावेळी मी विठ्ठलाच्या आरतीला जाणार आहे. मात्र मी मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. या संकटातून बाहेर काढण्याचं साकड विठ्ठलाला घालणार आहे. जर नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणजेच जनता माझ्यासोबत असेल तर विठ्ठल हे साकडं लवकरच पूर्ण करतील.

बातम्या आणखी आहेत...