आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद:दिवाळी म्हणजे भरपूर दिवे लावा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री आज दुपारी 1.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी दिवाळी, कोरोनाची परिस्थिती, बिहार निवडणुका आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल यावर भाष्य केले आहे. भरपूर दिवे लावा पण फटाके वाजवू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी नागरिकांना दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पाश्चिमात्य देशामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र आपल्या राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे.अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसोबत संवाद साधला.

दिवाळीत फटाके फोडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवाळीविषयी बोलताना म्हणाले की, 'गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्व व्यवहार पुर्वपदावर येत आहेत. अशावेळी खबरदारी घेणे हे आवश्यक आहे. ती विनंती करण्यासाठी आज बोलत आहे. आपण सर्वांनी जिद्द, आत्मविश्वास, शिस्तीने कोरोनाची लाट आटोक्यात आणली आहे. दरम्यान प्रदुषणामुळे हा विषाणू आपल्या फुफ्फुसावर परिणाम करत असतो. प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचा परिणाम वाईट परिणाम शरिरावर होतो. यामुळे दिवाळीत स्वत:हून फटाके वाजवणे टाळावे. प्रदुषण होईल असे फटाके फोडणे टाळा. राज्य सरकार फटाक्यांवर बंदी आणू शकते. मात्र तुम्ही स्वतःहून यावर निर्णय घ्या. स्वतःहून फटाके फोडू नका. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

बातम्या आणखी आहेत...