आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंचा पुणे दौरा ठरला:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, अजित पवारही असणार सोबत, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

राज्यभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. याच काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात आपल्या निवासस्थानावरुन राज्यातील कारभार पाहत आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीकास्त्र साधले जात आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा ठरला आहे. उद्या ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत आहे.

पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला आता स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच उत्तर मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील. यावेळी पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात बैठक ते घेणार आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 75 हजारहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली होती. एवढंच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisement
0